कोरोना रुग्णसंख्या स्थिर, तालुक्यासाठी दिलासादायक

इगतपुरीनामा न्यूज दि. ३ : इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी वाढतांना दिसत असून कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढत असल्याने किंचित का होईना पण दिलासा मिळतांना दिसत आहे. तब्बल ४८ जणांनी आज एकाच दिवशी कोरोनावर मात केली. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार ४९ नव्या संशयीत रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवस अखेर ३३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी ‘इगतपुरीनामा’शी बोलतांना दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!