ज्ञानोत्सव विद्यार्थी परिषदेत आयसीएमए नाशिक चॅप्टरच्या विद्यार्थ्यांचे यश

इगतपुरीनामा न्यूज – २२ ते २४ जानेवारीला इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकांऊटन्टस ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागातर्फे ज्ञानोत्सव विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी परिषदेचे नियोजन गुजरात येथील बडोदा चॅप्टरतर्फे करण्यात आले. या परिषदेत पश्चिम विभागातील गोवा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई व नाशिक चॅप्टर तर्फे ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परिषदेचा विषय “लर्निंग फोर ए बेटर टुमारो”असा होता. परिषदेत विविध मान्यवरांनी व्याख्याने दिली. याठिकाणी आयोजित पीपीटी व स्टार्टअप स्पर्धा चुरशीची ठरली. या स्पर्धेत नाशिक चॅप्टरच्या संघाने द्वितीय पारितोषिक पटकावले. पीपीटी संघात ऋतुजा जोशी, क्षितीज डोईफोडे तर स्टार्ट अप संघात सुयोग मालपुरे, आदित्य जोशी व मंथन ठक्कर यांचा सहभाग होता. या परिषदेसाठी नाशिक चॅप्टरतर्फे ४८ विद्यार्थी उपस्थित होते. नाशिक विभागाची जबाबदारी सीएमए नवनाथ गांगुर्डे व सीएमए संतोष ब्राम्हणकर  यांनी यशस्वीरित्या पार पाडली. आयसीएमए नाशिक संस्थेचे अध्यक्ष सीएमए अमित जाधव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

Similar Posts

error: Content is protected !!