इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी तालुका शाखेतर्फे दरवर्षी सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्ती आणि आदर्श शाळांचा सन्मान जानेवारीत केला जातो. या वर्षात तदेण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा तालुका कार्यकारिणीने केली असून शनिवारी ११ जानेवारीला लक्ष्मी लॉन्स गोंदे येथे खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर आदींच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. गणेश घाटकर ( पत्रकारिता ), धनंजय महाराज गतीर ( अध्यात्म ), डॉ. हनुमंता यादव बांगर ( वैद्यकीय ), हर्ष व्यास ( क्रीडा ), सुभाष गायकर ( सामाजिक ), शिल्पा किसन आहेर ( राजकीय ), बाल भैरवनाथ फाउंडेशन भरवीर ( संस्था ) यांना महर्षी पुंजाबाबा गोवर्धने कर्मवीर पुरस्कार दिला जाईल. स्व. अंबादास वाजे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सुवर्णा दामोदर म्हस्के, ज्ञानेश्वर पंडित देसले, तुकाराम रामदास वाजे, विष्णू पंढरीनाथ बोराडे, गंगाधर कारभारी व्यवहारे, राजेश रामदास खैरनार, लक्ष्मण बळीराम सावंत हे शिक्षक सन्मानित केले जातील. जिल्हा परिषद शाळा जामुंडे, सांजेगाव, खंबाळे, तळोघ, टाकेद खुर्द, कडवा वसाहत, तेलम वाडी यांना स्व. आर. के. खैरनार आदर्श शाळा पुरस्कार वितरण होणार आहे. सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक संघाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष निवृत्ती नाठे, तालुकाध्यक्ष भिला अहिरे, सरचिटणीस विनायक पानसरे, कोषाध्यक्ष दीपक भदाणे, लालू घारे, कार्यालयीन चिटणीस विवेक आहेर, सहचिटणीस हितेंद्र महाजन, महिला आघाडी प्रमुख माधुरी पाटील, महिला आघाडी सरचिटणीस सुशीला चोथवे आदींनी केले आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group