इगतपुरीनामा न्यूज – मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यवसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकचे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे ग्रामीण पोलीसांची जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरूध्द कारवाई सुरू आहे. त्यानुसार आज पहाटेचे सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबईकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करून विक्री करण्याचे उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती. ह्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर घोटी टोलनाका परिसरात छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक कमांक एमएच ०३ डीव्ही ७७९१ यामध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे इसम १) अली हसन गुलाम हुसेन, वय २५, रा. बनियाखुर्द, ता. बासी, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश, ह. मु. गोवंडी, शिवाजीनगर, ठाणे, २) मेहताब इबरार अली, वय २२, रा. हरैया, ता. बासी, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेतले. हे इसम हे चोरट्या रितीने गुटख्याची वाहतुक करतांना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून वाराणसी आशिक व शुध्द प्लस सिल्व्हर सुगंधीत गुटख्याचा ७ लाख ५० हजार ९२० रूपये किंमतीचा अवैध गुटखा व टाटा ट्रक क्रमांक एमएच ०३ डीव्ही ७७९१ असा एकुण २७ लाख ५० हजार ९२० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील ताब्यात घेतलेले इसम हे महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठ्यास प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत/स्वादीष्ट तंबाखू, पानमसाला, सुगंधीत स्वादिष्ठ सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरास सेवन करण्यास अपायकारक आहे हे माहिती असतांना देखील स्वतःचे फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगातांना मिळून आले. म्हणून त्यांच्याविरूध्द घोटी पोलीस ठाण्यात गुरनं ४५५/२०२४ भा.न्या.सं. कलम १२३,२७४,२७५,३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घोटी पोलीस करीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि संदेश पवार, पोलीस अंमलदार प्रकाश कासार, विनोद टिळे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले यांनी ही कारवाई केली आहे. गुटखा विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या असून याकामी पोलिसांकडून सत्वर कारवाई करण्यात येणार आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group