रचना – जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
चिव चिव चिडत चिमणी बोले !
घरट्यात माझ्या कोण गं आले !!
चिव चिव करत चिमणा डोले !
मीच आहेनां तुझाच गं भोले !!
घरटं बांधण्यास भांडण होई !
चिमणी रागाने उडून जाई !!
चिमणा चिमणी भांडत राही !
गवत काड्या आणत नाही !!
चिमणा चिमणी दिसती छोटे !
चोचीने विणती गवताची ताटे !!
गवत काड्यांचे बनवती घरटे !
चिमणीला खूप आनंद वाटे !!
चिमणी बोले नर चिमण्याला !
आपण पिल्ले घालू जन्माला !!
चिमणी उबवी गोल अंड्याला !
बारीक पिलांचा होई गलबला !!
चिव चिव करती पहाट वेळी !
चिमणी पाखरं जागवी आळी !!
चिमणी आणता बारीक अळी !
छोटीशी पिल्ले घटकन गिळी !!
चिमणी पिलांची तऱ्हाच न्यारी !
आईला बघता किलबिल करी !!
पिल्ले भूक लागली सांगती सारी !
चिमणी पिल्ले चिव चिव करी !!
बारीक पिल्लांचे तोंड होई वरी !
चोचीने चिमणी प्रेमे घास भरी !!
चिमणी सांगती तुम्ही रहा घरी !
पिलांना म्हणती येतो लवकरी !!
चिमणा चिमणीची घट्टशी नाळ !
दोघेही पिलांचा करी सांभाळ !!
पिलांना मिळण्या पंखात बळं !
खाऊ घाली गोड रानाची फळं !!
चिमणा चिमणी दोघेही हुशार !
फुलवती प्रेमाने सुखी संसार !!
स्वार्थाचा कुठेही नसे अहंकार !
स्वच्छंद फिरती सारे घरदार !!
सुखात उडती चिमणी पाखरे !
आंनदी राहण्या गगनात फिरे !!
चिमणी म्हणती सांगू का खरे !
तुम्ही पण मानवा सुखी रहा रे !!
( कवी जी. पी. खैरनार हे नाशिकच्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक असून सर्वोत्तम कविता करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. )