इगतपुरीनामा न्यूज दि. २१ :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२१ चे आयोजन दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येत असल्याचे परीक्षा परिषदेकडून जाहिर करण्यात आले होते. तथापि त्याच तारखेला केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दि. १० ऑक्टोबर २०२१ ऐवजी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदर बदलाची संबंधित परीक्षार्थींनी नोंद घ्यावी आणि सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षेला उपस्थित राहावे असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.
सविस्तर वेळापत्रकासाठी परीक्षा परिषदेच्या पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी👇
mahatet.in