तरुणांची उगवती ताकद कोणाच्या मानगुटीवर बसणार ? प्लस मायनसचे गणित लकीभाऊ जाधव यांना बेरजेचे ठरणार का ?

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा तोंडावर पक्षांतराची रेलचेल झाली. त्यात या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात राजकीय पदाधिकाऱ्यांनी उड्या मारल्या. पक्षात होते तोपर्यंत त्या पक्षाचे निष्ठावान आपणच म्हणवून घेणारे निष्ठा वगैरे बाजूला ठेवत व स्वहित जोपासत दुसऱ्या पक्षात सामील झाले. हे पक्षांतराचे प्लस मायनसचे गणित मात्र काही जणांना बेरजेचे ठरणार असल्याचे चित्र असले तरी ते कोणाला तारणार व कोणाला भोवणार हे निकालातून स्पष्ट होईल. विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्या अनेक लोकांना सोबत घेत काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नाराज माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी मनसेची उमेदवारी करून बंडखोरी केली. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या माजी आमदार निर्मला गावित यांनीही बंडखोरी करून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोबतीला शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि थोडीबहुत काँग्रेस, राष्ट्रवादीही बंडात सामील झाली. अजूनतरी त्या त्या पक्षांनी संबंधित नेत्यांवर काही कारवाई केली नसली तरी ही कठोर कारवाई कोणत्याही क्षणी होऊन अनेकांची राजकीय आत्महत्या उघडकीस येऊ शकते. 

प्लस मायनसचे राजकारण अतिशय वेगळ्या वळणावर जाऊन ठेपले आहे. मूळ काँग्रेसी विचारांचा हा मतदारसंघ असल्याने त्याची विचारधारा टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे यांनी अतिशय उमेदीने पक्षाचा झेंडा उंचावत “होऊनच जाऊ द्या” ची भूमिका घेतली. नव्या जुन्या आणि जाणत्या लोकांची फळी उभारून इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांना विजयी करण्यासाठी त्यांनी अतिशय सूक्ष्म आणि प्रभावी नियोजन केले. अन्य उमेदवारांच्या तुलनेत लकीभाऊ जाधव हा उमदा तरुण लोकांच्या पसंतीला उतरवला आहे. विरोधी उमेदवाराचा ठेकेदारांचा गोतावळा, श्रीमंतांचा बडेजाव आणि रडणारा नाही तर लढणारा लकीभाऊ जाधव आमदार करावा असे आवाहन केले जातेय. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील युवकांनी त्यांचा आयडॉल असणाऱ्या लकीभाऊ जाधवसाठी सर्वांगीण प्रयत्न सुरु केलेत. तरुणांची ही फौज प्रस्थापित नेत्यांच्या मुळावर बसणार आहे. दिवसेंदिवस युवकांकडून लकीभाऊ जाधव यांच्यासाठी सूत्रबद्ध काम केले जात आहे. दोन्हीही तालुक्यात तरुणांची ताकद आपल्या निर्णायक भूमिकेतून कोणाच्या मानगुटीवर बसते हे लवकरच समजणार आहे. 

Similar Posts

error: Content is protected !!