महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मशताब्दी दिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यात स्वच्छ भारत अभियान संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जिल्हा रायगड हे एक सेवाभावी व समाजाभिमुख लोकोपकारी उपक्रम करणारे प्रतिष्ठान आहे. प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संवर्धन, जलपुनर्भरण, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर यासह गरजूंना शालेय साहित्य पुरवणे, साक्षरता वर्ग चालवणे, विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन असे उपक्रम प्रतिष्ठानमार्फत राबवले जातात.
आज महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मशताब्दी दिवस असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी “स्वच्छ भारत अभियान” या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्राचे स्वच्छता दूत, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राज्यभरात आयोजित केले.

या अंतर्गत आज नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, घोटी, इगतपुरी, येवला, निफाड, सटाणा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, अकोले येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियान सकाळी ७ : ३० वा. सुरू झाले व १० : ३० वाजेपर्यंत शिस्तबद्ध रीतीने पूर्ण झाले. यामध्ये प्रतिष्ठानच्या १८९९ सदस्यांनी सहभाग नोंदवला २३३८५३ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली कार्यालये, ९८ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून ६५.८५६ टन कचरा गोळा केला. याकामी मनपा /ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. इगतपुरी पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय येथेही स्वच्छता अभियान राबिवण्यात आले. उपक्रमाला तेथील कार्यालयातील शासकीय अधिकारी, नगरसेवक, मनपा अधिकारी व विविध पदावर असलेले मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी प्रतिष्ठानचे हे कार्य अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय आहे असे सांगून प्रतिष्ठानच्या पुढील कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!