साकुर सोसायटीकडून सभासदांना ५ टक्के लाभांश बँक खात्यात वर्ग ; सीएससी सेंटरही होणार सुरु : चेअरमन विष्णू नामदेव सहाणे, व्हॉ. चेअरमन नंदू शिवराम सहाणे यांची माहिती

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील साकुर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित साकुर यांनी सभासदांना २०२३-२४ वर्षासाठी ५ टक्के लाभांश बँकेच्या खात्यात वर्ग केला आहे. नाशिक जिल्ह्यात सहकारी सोसायट्या आर्थिक अडचणीत असतांना ही संस्था सभासदांना लाभांश देणारी इगतपुरी तालुक्यातील पहिली संस्था ठरली आहे. यासह कॉमन सर्व्हिस सेंटर मंजूर करून आणण्यात यश आले आहे. काही दिवसात हे सेंटर कार्यान्वित होणार असून त्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी संपूर्ण सहकार्य केल्यामुळे यश मिळवता आले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन विष्णू नामदेव सहाणे, व्हॉइस चेअरमन नंदू शिवराम सहाणे यांनी दिली. यावेळी साकुर सहकारी सोसायटीचे संचालक जगन नामदेव सहाणे, दिनकर सुरेश सहाणे, तुकाराम आनंदा सहाणे, भीमा देवराम सहाणे, भरत शिवाजी सहाणे, रावसाहेब भीमसेन सहाणे, खंडू संतू कुकडे, मुक्ताबाई अर्जुन घाडगे, द्रौपदाबाई वामन सहाणे, सुरेश दामू रणशुरे, त्र्यंबक धोंडू आवारी, समाधान सहाणे, पंढरी सगर, किशोर हरी सहाणे, ॲड. सूर्यभान नरहरी सहाणे, सचिव श्री. शिंदे उपस्थित होते. सोसायटीचे मार्गदर्शक ॲड. संदीप गुळवे यांनी संस्थेच्या कामांचे कौतुक करून भविष्यात संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

Similar Posts

error: Content is protected !!