स्वराज्यचे युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांच्याकडून अक्षय तृतीयेनिमित्त शुक्लतीर्थावर महाप्रसादाचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज – अक्षय तृतीयेच्या निमित्ताने खेड भैरव जवळील शुक्ल तीर्थावर स्वराज्य संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांनी आपल्या कुटुंबा समवेत महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी तीर्थ क्षेत्रावरील कळसूआई पालखी मंदिरात कैलासनाथ गुरू गोदावरीनाथ सतनाथ यांच्या हस्ते यथोचित पूजा करण्यात आली. अगस्ती ऋषींचे शिष्य असलेले सुतीक्षन महामुनी यांनी शुक्लतीर्थावर घोर तपश्चर्या केली आहे. त्यामुळे येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. तीर्थावर नर्मदेश्वर महादेव मंदिर, सिद्धी विनायक गणपती , कळसुआई पालखी मंदिर असून अनेक भाविक दर्शन घेतात. आयोजित कार्यक्रमात भाविकांनी महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.

युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांचा तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक, धार्मिक कार्यक्रमामध्ये नेहमीच मोलाचा सहभाग असतो. सामाजिक भावनेतून ते अन्नदान करीत असतात. याप्रसंगी स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नारायण जाधव, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष शिवाजी काजळे, माजी सैनिक विजय कातोरे, हरीश चौबे, मच्छिंद्र खातळे, चंपालाल जगताप, संदीप पागेरे, अरुण भोर, अजय कश्यप, विकास शिरसाठ, हृतिक जाधव, कृष्णा गभाले, निलेश काळे, रोहिदास काळे, गणेश काळे, दीपक काळे, राजेंद्र खातळे उत्तम धोंगडे, भास्कर घोडे, मच्छिंद्र भोर आदी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!