कोरोना काळात आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्य जनतेस जीवदान देणारे – डॉ. कपिल आहेर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेच्या ६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे चेअरमन फैय्याज खान यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमित्ताने निवृत्त आरोग्य कर्मचारी सन्मान सोहळा व सभासद पाल्य गुणगौरव सोहळा नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की माझे वडील स्व. डॉ. प्रकाश आहेर यांनी आपली शासकीय सेवा कर्मचारी संघटना व पतसंस्था यांना वेळ देऊन आरोग्य सेवेतील घटकांच्या सेवेसाठी व्यथित केली. प्रत्येक मनुष्य आपल्या भावी पिढीसाठी आपल्या आयुष्याचा त्याग करुन भावी पिढीचे स्वप्न पाहात जीवन जगत असतो. तेच स्वप्न माझे वडील डॉ. प्रकाश आहेर यांनी पाहिले व मला जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य या पदावर आसनस्थ होण्याचा मान त्यांच्यामुळे मिळाला हे अभिमानाने नमूद करावे लागेल. आपण उपस्थित पाल्य यांचे सुद्धा भविष्य चांगले घडावे हीच प्रत्येक पालकांची इच्छा असते हे मला आज जाणवत आहे. आरोग्य कर्मचारी पतसंस्था थोड्या अवधीतच ९१० च्या पुढे सभासद करुन स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत होऊन सहा कोटीच्या पुढे भागभांडवल झाले आहे ही मोठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले.

मुख्य अतिथी म्हणुन मनोगत व्यक्त करतांना चित्रकार हर्षाली शिंदे यांनी नमूद केले की आरोग्य कर्मचारी पतसंस्था सभासदांना सात लक्ष रुपये तात्काळ कर्ज व  विमा सुरक्षा कवच योजना प्रभावीपणे राबवत आहेत ही अभिनंदनीय बाब आहे. कोरोना साथरोग काळात ग्रामीण भागातील जनतेस आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून, कुटुंबापासून एक- एक महिना दूर राहुन खरे कोरोना योद्धा म्हणुन जनतेची सेवा केली त्याबद्दल आरोग्य अधिकारी व  कर्मचारी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. संस्थेच्या संचालक मंडळाने माझ्या सारख्या तरुणीस प्रमुख अतिथी म्हणुन आमंत्रित करुन माझ्या कलेचा गौरव केला ही माझ्यासाठी खुप मोठी कौतुकाची थाप आहे.

नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेच्या ६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील वार्षिक सभेच्या इतिवृत्तास मान्यता देणे, सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाची नफा वाटणीस मान्यता देणे, पतसंस्थेस ३१ मार्च,२०२२ अखेर कमी जास्त झालेल्या खर्चास कार्योत्तर मान्यता देणे, पतसंस्थेच्या सन २०२२-२३ च्या अंदाज पत्रकास मान्यता देणे, सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापीत करणे व पतसंस्थेच्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या लेख्यांचे सनदी लेखापाल यांनी केलेल्या लेखा परीक्षणाचे वाचन करुन लेखा परीक्षण अहवालास मान्यता देणे आदी विषयांवर सभासदांनी सहभाग नोंदवुन सखोल चर्चा करुन एकमुखाने मान्यता देण्यात आली.  

नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक ही संस्था आपल्या सभासदांना जमा शेअर्स रकमेवर आठ टक्के नफा वाटणी जाहीर करत आहे.  नफा वाटणी सोबत आरोग्य कर्मचारी विमा कवच माध्यमातुन सभासदांचे आकस्मित निधन झाल्यास त्याच्या वारसास १ एप्रिल २०२२ पासुन चार लक्ष पर्यंत विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
- फैय्याज खान, चेअरमन

नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस व्हॉईस चेअरमन जयवंत सुर्यवंशी, सचिव सुनिल जगताप, संचालक जी. पी. खैरनार, मधुकर आढाव, विजय देवरे, विजय सोपे, जयंत सोनवणे, प्रशांत रोकडे, संजय पगार, गोरक्षनाथ लोहकरे, श्रीकांत अहिरे, तुषार पगारे, सुलोचना भामरे व सोनाली तुसे, नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेचे संचालक दिपक अहिरे यांचेसह जेष्ठ सभासद सुभाष कंकरेज, संजय संवत्सरकर, बाळासाहेब चौधरी, अनिल राठी, प्रणिता देशमुख, जगन्नाथ जमधडे, मीरा देशमुख, कैलास देवरे, एकनाथ वाणी, दिनेश ठाकरे, विजय चौधरी, महेंद्र गांगुर्डे, वामन पैठणकर, प्रतीक सोनवणे, सुनील देवकर, प्रशांत सोनवणे, सुरेश जाधव, एकनाथ वाणी, बाळासाहेब कोठुळे, सुदेश इनामके, दिलिप भालेराव, राजेंद्र सोनवणे, प्रमोद घरटे, हितेश घरटे, शरद घरटे, अनिल तिडके, अनिल भामरे, उमेश अग्रवाल, धनराज ठाकरे, राजेश शिरसाट, निलेश माठा, जी. डी. खैरनार, कल्पना इंदरके, सविता बागुल, वर्षा सपकाळे, भिका केदारे, भूषण धुमाने, पंढरीनाथ चव्हाण, शैलेंद्र जाधव, सतीश गुजरे, कमलाकर जाधव, आत्माराम अहीरे, जनार्दन भामरे, मुक्ता आव्हाड, दिनेश शेवाळे यांनी सभेतील चर्चेत भाग घेऊन आपला सहभाग नोंदविला.

सभेचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन फैय्याज खान यांनी केले तर संस्थापक चेअरमन तथा मुख्य प्रवर्तक जी. पी. खैरनार, संचालक मधुकर आढाव, विजय सोपे, श्रीकांत अहिरे – पाटील, तुषार पगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अहवाल वाचन संस्थेचे सचिव सुनिल जगताप यांनी केले तर वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष जयवंत सुर्यवंशी यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!