बेपत्ता गणपत तुपे ह्या युवकाचा शोध लावण्याचे घोटी पोलिसांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी जवळ असणाऱ्या देवळे गावातील एक युवक मंगळवारी सकाळी नाशिकला जातो असे सांगून बेपत्ता झाला आहे. तेव्हापासून त्याचा मोबाईल बंद असून त्याचा शोध लागला नसल्याने त्याच्या कुटुंबाने घोटी पोलिसांकडे शोध लावण्याबाबत खबर दिली आहे. या युवकाबाबत कोणालाही काही माहिती असल्यास घोटी पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती अशी की, गणपत बाबुराव तुपे वय ४२ रा. देवळे घोटी ता. इगतपुरी, जि. नाशिक हा नामांकित सीए असणारा हा युवक मंगळवारी सकाळी नाशिकला जातो असे सांगून घरून निघाला. मात्र तेव्हापासून त्याच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याने त्यांचा परिवार चिंताग्रस्त आहे. याबाबत त्याच्या कुटुंबाने घोटी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची खबर दिली आहे. गणपत बाबुराव तुपे याचे वय ४२ असून शरीराने बारीक, उंची 5 फूट 4  इंच, रंगाने गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, अंगात आकाशी शर्ट, निळी जिन्स पॅन्ट, पांढरा बूट, लॅपटॉप बॅग सोबत आहे. या युवकाबाबत कोणाला काही माहिती असल्यास घोटी पोलीस ठाणे अथवा नजीकचे पोलीस ठाणे किंवा संपत तुपे 9307317625, मिथुन चव्हाण 8655419812  यावर कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!