इगतपुरीनामा न्यूज – मुंढेगांव येथील शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ५५० विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी विद्यार्थ्यांचा योगासनांचा सराव घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी मान, हात आणि पायाचे अशा सर्व योगासनाचे प्रकार केले. हस्त संचालन, गुडघा संचालन, ताडासन, त्रिकोणासन, वृक्षासन, पादस्तासन, वज्रासन, हलासन भुजंगासन, शलभासन, शिशु आसन, उष्ट्रासन, कपालभाती, भ्रामरी, शितली व नाडीशोधन प्राणायामाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी केले. शेवटी ध्यान व प्रार्थना घेण्यात आली. यावेळी योगशिक्षक सुनिल सानप यांनी योगाचे महत्व, विविध आसनांची माहिती आणि प्रात्यक्षिक घेतले. मुख्याध्यापक तन्वीर जहागिरदार यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सोप्या शब्दात सांगितले. एकलव्य बोरीपाडा येथील प्राचार्य राजेश सोनकांबळे, दोन्ही शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित होते. कार्यक्रम आयोजनामध्ये नासिकचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, उपायुक्त सुदर्शन नगरे, प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव सर यांचे सहकार्य लाभले.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group