इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 ( प्रभाकर आवारी, मुकणे )
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथे २०० नागरिकांनी लस घेऊन अभूतपूर्व प्रतिसाद दिला. वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आणि ग्रामपंचायत मुकणे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. आहे. वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी, घोटी बाजार समितीचे संचालक विष्णु पाटील राव, सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, ग्रामसेवक आर. पी. जाधव आदींनी लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
गावातील अनेक नागरिकांनी आमच्या मुकणे गावात लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम घ्यावा अशी मागणी घोटी बाजार समितीचे संचालक विष्णु पाटील राव, मुकणेचे सरपंच हिरामण राव व उपसरपंच भास्कर राव केली होती. ह्या अनुषंगाने वाडीवऱ्हे आरोग्य केंद्राच्या साहाय्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी दहा वाजेपासून लसीकरण संपेपर्यंत येथील वयोवृद्ध आणि ४५ वयोगटाच्या पुढील पुरुष आणि महिला ग्रामस्थांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत २०० जणांनी ही लस घेतली. इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, वाडीवऱ्हे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी, आरोग्य सहाय्यक टी. पी. अहिरराव, आरोग्यसेवक ए. एस.खैरनार, पी. एच. चौधरी, बी.आर. मोरे, समुदाय आरोग्य अधिकारी स्मिता घोडेराव, भाग्यश्री साळवे, रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण कार्यक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. आशा कार्यकर्ती हिरा वारघडे, अनिता मुकणे, शारदा उबाळे, सरला धांडे, अंगणवाडी कार्यकर्ती प्रमिला बोराडे, अर्चना उबाळे, अश्विनी उबाळे, आरोग्य विभागाचे व ग्रामपंचायतचे कर्मचारी आदींनी लसीकरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. घोटी बाजार समितीचे संचालक विष्णु पाटील राव, मुकणे ग्रामपंचायतीचे सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, ग्रामसेवक आर. पी. जाधव, आरोग्य विभागाचे कर्मचारी यादव बोराडे, सुनील राव, अंकुश राव, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षिक प्रशांत चव्हाण, जयश्री ब्राम्हणकर, वंदना पाटील, सरला पाटील, प्रतिभा पाटील, नीता गोसावी, प्रमिला जगताप आदींसह ग्रामपंचायत सदस्यांनी ह्या कार्यक्रमासाठी सहयोग दिला. सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सन्मान करण्यात आला.
■ मुकणे गावाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमात दिलेला प्रचंड प्रतिसाद अतिशय कौतुकास्पद आहे. वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, मुकणे गावातील नागरिक, सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, शिक्षक आदींनी विशेष काम केले. लस अतिशय सुरक्षित आहे. लस घेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. वाडीवऱ्हे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे चांगले यश मिळते आहे.
– विष्णु पाटील राव, संचालक : घोटी बाजार समिती