इगतपुरीनामा न्यूज – आज शुक्रवारी दुपारच्या सुमाराला त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील मानस लॉजिंग व बोर्डिंग येथे कुंटनखाना चालत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल मानस लॉजिंग व बोर्डिंग येथे बनावट गिऱ्हायिक पाठवून हॉटेल मानस लॉजिंग व बोर्डिंग येथे एक बळीत महिलेची सुटका करण्यात आली. कुंटनखाना चालवणारे दलाल किशोर निवृत्ती शिंदे, रा. खंबाळे, ता. त्र्यंबकेश्वर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मानस लॉजिंग व बोर्डिंगचा मालक गणेश भिका मोरे, रा. खंबाळे, ता. त्र्यंबकेश्वर हा फरार झाला आहे. ही कारवाई वरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे गुरनं. ८८/२०२४, कलम ३७०, ३४ भादंवि सह कलम ३, ४, ५, ६ पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहा. पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोहवा नवनाथ सानप, चेतन संवस्तरकर, पो. हवा. किशोर खराटे, सतिष जगताप, संदिप नागपुरे, पो. ना. विश्वनाथ काकड, पो. शि. कुणाल मोरे, नितीन जाधव, महिला पो. ना. योगीता काकड, महिला पो. शि. छाया गायकवाड, चालक सपोउनि, गोजरे यांच्या पथकाने हा छापा टाकुन कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायविरोधी अभियान सुरू करून जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याकामी मोहीम सुरूच राहणार आहे.