इगतपुरीच्या ॐ बजरंग ग्रुपतर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त अन्नदान

इगतपुरीनामा न्यूज, दि. 27 ( वाल्मीक गवांदे, इगतपुरी )
इगतपुरी शहरातील महादेव नगर येथील ॐ बजरंग ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी साध्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा केला. हनुमान प्रतिमेचे पुजन करून मिरवणुक न काढता जन्मोत्सव साजरा करीत परंपरा कायम ठेवली. कोरोना महामारीच्या संकटात गर्दी न करता सोशल डिस्टन्स ठेवुन ग्रुपच्या सदस्यांनी पुजापाठ केले. यानिमित्ताने शहरातील गरजुंना महाप्रसाद म्हणुन अन्नदान करण्यात आले.
भक्तांनी कोरोना संकटापासून कायमची मुक्ती मिळावी म्हणुन हनुमान चालीसा पठण करीत हनुमानाला साकडे घातले. सालाबादप्रमाणे हनुमान जन्मोत्सव खंड न पडता साध्या पद्धतीने साजरा केला. शहरातील हनुमान मंदिरातील पुजाऱ्यांनी मंदिरात पुजा करून जन्मोत्सव साजरा केला.
ॐ बजरंग ग्रुपने प्रसाद आणि गरजूंना अन्नदान केल्याने शहरात कौतुक करण्यात आले. यावेळी ॐ बजरंग ग्रुपचे अध्यक्ष निखिल कर्पे, सदस्य विनायक इंदापुरकर, गणेश मंडाले, आकाश गादेकर, नितीन वर्देकर, सागर मंडले, दिपक पानकर, गिरीष वर्देकर, अर्थव वर्देकर, विकी वर्देकर, राणा वर्देकर, गणेश कवटे, विजय शिंदे, नितीन पवार, निलेश वर्देकर, मयुर मेठी, अमित कोमकर, आदि उपस्थित होते.