लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १० – इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुकच्या ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदैवत जगदंबा मातेच्या यात्रौत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराची रंगरंगोटी गावातील लष्करी जवानांच्या आर्थिक योगदानातून झाली असून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळी जगदंबा मातेची महापूजा करून यात्रेनिमित्त आई जगदंबा मुकुटाची शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी महिलांनी आपापल्या अंगणात रांगोळीचे सडे टाकले होते.
नांदगाव बुद्रुक येथे आई जगदंबेचे ब्रिटिशकालीन मंदिर भक्तांना प्रेरणा देणारे असून अनेकांचे नवस पूर्ण होत असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा आहे. या देवी मंदिराची अखंड सेवा पुजारी लक्ष्मण महाराज महाजन करतात. उद्या शनिवारी कुस्तीची दंगल होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी सरपंच अनिता देवा मोरे, उपसरपंच मनीषा दिनकर गायकर, हिरामण गायकर, सुखदेव गायकर, भाऊसाहेब मांडे, तानाजी गायकर, मोहन झोमान, दत्तू गायकर, रमेश माळी, बबन पावडे, लहानु पगारे, अरुण शिरसाठ, योगेश पाळदे, व्यापारी बँक सल्लागार सुभाष गायकर, पहिलवान संदीप गायकर, वसंत गायकर, पुजारी लक्ष्मण महाजन, विलास संधान, शालेय समिती अध्यक्ष दादाभाऊ शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते देवा मोरे, दिनकर गायकर विजय गावंडे आदी उपस्थित होते.