इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्यभर मराठी भाषा गौरव दिन अर्थात कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन साजरा करण्यात येतो. ह्या कार्यक्रमात योगिता भांगरे, वर्षा गतीर व रोहिणी राजनोर यांनी मराठी भाषा व मराठीतील विविध साहित्य याचे दर्शन घडविणारे भित्तीपत्रक सादर केले. प्रियंका पवार, वैशाली पवार व रेणूका गुजराथी यांनी गीत सादर केले. देवयानी भागडे, सानिका भागडे, वर्षा गतीर व रेणूका गुजराथी यांनी उत्कृष्ट भाषण केले. प्रमुख पाहुणे संगीता खिल्लारे आपल्या भाषणात विविध उदाहरणद्वारे मराठी भाषा किती थोर आहे हे श्रोत्यांना पटवून दिले. प्रमुख वक्ता डॉ. बाळू घुटे यांनी आपल्या भाषणात कुसुमाग्रजांच्या लेखनाविषयीं माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या प्रतिभा हिरे यांनी मराठी साहित्यातील विविधता व समृद्धता याचे वर्णन केले. मराठी भाषा जपणे व तिची संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे या विषयी शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. ललिता अहिरे यांनी सध्याची मराठी भाषेविषयी मराठी भाषिक लोकांमध्ये असलेली उदासीनता प्रकट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता भांगरे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group