इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीतील जोगेश्वरी येथून निवृत्त शिक्षक सारंग चिमोटे हे नाशिक येथे जाण्यासाठी निघाले होते. जुन्या महामार्गावरील मधुर सोसायटीसमोर मोटरसायकल वरून आलेल्या अज्ञात चोरट्याने चिमोटे आणि त्यांच्या मागे येणाऱ्या साथीदाराला पोलीस असल्याची बतावणी केली. पुढे एकाकडे कट्टा सापडला असून तुमच्याकडील सोन्याची चैन व अंगठी माझ्याकडे द्या. मी ती रुमालात तुम्हाला बांधून देतो अशी बतावणी केली. या घटनेत १ लाख ५ हजारांचा ऐवज घेऊन मोटरसायकलस्वार व त्याच्या साथीदाराने पोबारा केला. चोरटे गेल्यावर चिमोटे यांनी रुमाल तपासल्यावर त्यांना चैन व अंगठी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात जाऊन घटना सांगितली. ही घटना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी दोन्ही अज्ञात चोरट्याविरुद्ध इगतपुरी पोलिसांनी कलम ४१९, ४२०, १७०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group