अहिल्याबाई होळकर यांचा अपमान करणाऱ्या दीड फुट्याला ठोकून काढू : जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25
महाराष्ट्रासह भारतामध्ये राजमाता अहिल्याराणी होळकर यांनी स्वकर्तृत्वावर राज्यकारभार केला. समाजहीत जपलं, गोरगरिबांना मदत केली, पाणवठे बांधले आणि बत्तीस वर्ष राज्यकारभार केला. त्या राजमाता अहिल्याराणी होळकर यांना अतुल परचुरे नावाचा दीड फुट्या कलाकार  ‘अहिल्याबाई होळकरीन’ म्हणून हिनवतो. आणि सगळे दात काढून हासतात… हे अतिशय गंभीर आणि निषेधार्ह आहे. हे महाराष्ट्र आणि जिजाऊ ब्रिगेड अजिबात खपवून घेणार नाही. दीड फुट्या अतुल परचुरे याने तात्काळ माफी मागावी अन्यथा ठोकून काढू असा सज्जड इशारा जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती माधुरी भदाणे यांनी दिला आहे.
कलर्स मराठी ह्या चॅनलवर सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस या कार्यक्रमात काल अतुल परचुरे ह्या दीड फुट्याने जाणीवपूर्वक विनोदी शैलीमध्ये इतरांना हिनवून बोलताना राजमाता अहिल्या होळकर यांनाही ‘होळकरीन’ म्हणून अपमान केला. हा चॅनलचा आणि अतुल परचुरेचा करंटेपणा आहे. कलर्स मराठी चॅनलच्या कार्यक्रमांमध्ये याबाबत तात्काळ जाहीर माफी मागावी. दीड फुट्या अतुल परचुरेने सुद्धा त्यात कार्यक्रमांमध्ये माफी मागावी. अन्यथा महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड अतुल परचुरेला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.

Similar Posts

Comments

  1. avatar
    दिपाली वाघ कांबळे says:

    हे मनुवादी संस्कार आहेत. निषेध परचुरेचा

Leave a Reply

error: Content is protected !!