
एकनाथ शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत राहून देशाची सेवा करण्याची चांगली संधी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत दहा टके तरुण तरुणी शासकीय सेवेत असायला पाहिजे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून गुणवंतांनी समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन कॅप्टन अशोककुमार खरात यांनी केले. आपल्याकडून समाजाला काहीतरी देणे आहे असल्याने देवाने लक्ष्मण महाराजांकडून देवीच्या मंदिराची देवीची स्थापना करुन घेतली. त्यांच्याकडून समाजाची सेवा घडत असून ती सेवा प्रेरणादायी आहे असे गौरवशाली उदगार प्रवचन सेवेतून भगवताचार्य महंत संजीवनदास महाराज यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील जगदंबा मंदिराच्या सहाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने भव्य सोहळा संपन्न झाला. नाशिकरोड येथील महेश खरजूला यांनी सुश्राव्य बासरी वादन केले. यावेळी जगदंबा मंदिर संस्थापक लक्ष्मण महाराज गुरव, कॅप्टन ब्राहमंड शास्त्रज्ञ अशोककुमार खरात आदींसह परिसरातील भाविक भक्त, समस्त ग्रामस्थ नांदगाव बुद्रुक आदी उपस्थित होते.