इगतपुरीनामा न्यूज, दि. 25
इगतपुरी तालुक्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 32 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले. आज अवघ्या 26 नव्या व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. आज दिवस अखेर 263 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी “इगतपुरीनामा” ला दिली. तालुक्यातील नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून कोरोना उच्चाटन करण्यासाठी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
इगतपुरी तालुक्यात बहुतांश ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाला नागरिक उत्तम प्रतिसाद देत आहेत. अधिकाधिक लसीकरण व्हावे यासाठी आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि जाणकार नागरिकांकडून मोठे सहकार्य मिळत आहे. ज्यांनी अद्याप लस घेतली नाही अशा व्यक्तींनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. लस अतिशय सुरक्षित असून कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नसल्याचे नागरिक सांगतात.
कोरोना व्हायरसचा ( Covid-19 ) संसर्ग झाला आहे की नाही ? हे तपासून पाहण्यासाठी रक्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही. कोरोना लक्षणग्रस्त व्यक्तीचे घशातील स्त्रावाचे नमुने आणि नाकातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही ? हे ठरवलं जातं. अन्यथा, रुग्णाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहणं आवश्यक आहे. ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.