दौंडतला लसीकरण कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25 ( निलेश काळे, पिंपळगाव मोर )

वाढत्या कोरोनाच्या संक्रमण काळात बहुगुणी व प्रभावी अशा कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाला दौंडत ता. इगतपुरी येथे उत्तम प्रतिसाद मिळाला. प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्ते व उभाडे उपकेंद्र अंतर्गत लसीकरण शिबीर आयोजित केले होते. दौंडत येथील परिसरातील गावाच्या ४५ वर्षे पूर्ण असणाऱ्या जवळपास १५८ नागरिकांनी आज लस घेतली.
लसीकरण सत्राकामी डॉ. जी. एस. काळे, एस. एस. कोळी, सोनवणे, आरोग्य सहाय्यक लॉन्द्रीक, आर. एस. आवारी, आरोग्य सेविका व्ही. डी. गुजर, एम. एल. गवळी, आर. बी. पाटील, एस. एस. दिंडे, एम. पी. गावित, एस. एस. तोकडे, वाय. जी. मोसे, बी. ए. बोराडे, एन. व्ही. बोराडे, संतोष बगाड तसेच अंगणवाडी कर्मचारी बी. जी. शिंदे, जयश्री बोराडे यांसह गावातील शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, शिपाई व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. लसीकरण शिबिराकामी पांडुरंग मामा शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले