इगतपुरीनामा न्यूज, दि. 8
इगतपुरी तालुक्यात आज नव्याने 40 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यामध्ये ग्रामीण भागातील नांदगाव बुद्रुक परिसरातील आदिवासी वाड्यांमधील रुग्णांची संख्या अधिक आहे. कोरोना पासून कोसो दूर असणाऱ्या आदिवासी वाड्या कोरोना बाधित होत असल्याने चिंता गडद झाली आहे. इगतपुरी, घोटी शहरातही रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची अत्यावश्यकता आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 405 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजच 55 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान शासनाच्या मिनी लॉकडाऊनला बेशिस्तीचे ग्रहण लागलेले असल्याने जागरूक नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.
विशेष संपादकीय : कोरोना पॉझिटिव्ह अत्यवस्थ रुग्णांवर “पॉझिटिव्ह” विचारांचा उतारा
इकडे लक्ष द्या…!
कोरोनाशी संबंधित कोणतेही लक्षण आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. अंगावर कोणतेही दुखणे काढू नये. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. बर्फानी आरोग्य प्लस ह्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधांचे सेवन करावे. हे औषध जवळच्या मेडिकल स्टोअरवर उपलब्ध असून चौकशीसाठी 7038394724 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.