कोरोना अपडेट : मंदगतीने कोरोनामुक्तीचे संकेत : आजपर्यंत ४० हजार व्यक्तींचे लसीकरण पूर्ण

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

इगतपुरी तालुक्यात आज ४ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनाचा पराजय केला. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आज अवघ्या २ नव्या व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना बाधित आला. आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या अहवालानुसार इगतपुरी तालुक्यात १४ कोरोना बाधित व्यक्तींवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. मंदगतीने का होईना इगतपुरी तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गाने वाटचाल करीत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला तालुक्यात वेग आला असून नागरिक स्वतःहून पुढे येत आहेत. आज अखेर पर्यंत इगतपुरी तालुक्यात तब्बल ४० हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आगामी काळात अधिकाधिक व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मातोश्री हॉस्पिटल, श्रीराम वाडी घोटी येथे Star Health Insurance धारकांसाठी Cashless Facility सुरु झाली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - डॉ. जितेंद्र चोरडिया 9028399899

Leave a Reply

error: Content is protected !!