
इगतपुरीनामा न्यूज – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने इगतपुरी तालुका समता परिषदेतर्फे घोटी येथे रेशनकार्ड शिबीर संपन्न झाले. शिबिराचे आयोजन तालुकाध्यक्ष शिवा काळे यांनी केले होते. उपस्थितांच्या हस्ते ५० गरजू व वंचित कुटुंबांना नवीन रेशनकार्ड आणि दुय्यम प्रत पिवळे, केशरी रंगाचे कार्ड वितरित करण्यात आले. कार्यक्रमासाठी समता परिषदेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात नव्याने अर्ज दाखल केलेल्या नागरिकांना लवकरच रेशनकार्ड देण्यात येईल असे शिवा काळे यांनी सांगितले.