कावनई परिसरात ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत ; वनखात्याने दखल घेण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात बिबट्या पुन्हा सक्रिय झाल्याच्या घटना ऐकायला यायला लागल्या आहेत. कावनई येथील गजानन महाराज यांच्या तपोभूमी भागात बिबट्या दिसून आला आहे. तेथून जवळच असणाऱ्या विलास आगिवले यांच्या घरासमोरील बांधकाम सुरु असलेल्या घरात बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास बिबट्या शिरला. बकरीचा ओरडण्याचा आवाज आल्याने आगिवले यांनी त्या दिशेने बॅटरीचा उजेड केला. बॅटरीचा उजेड अंगावर पडताच ह्या बिबट्याने धूम ठोकली. बिबट्या आल्याचे समजताच आजूबाजूचे ग्रामस्थ जमा झाले. मात्र तोवर बिबट्याने एका बोकडाचा फडशा पाडला होता. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. इगतपुरीच्या वनविभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!