इगतपुरीतील कुख्यात गुन्हेगाराला ग्रामीण पोलीसांनी मुसक्या आवळून केले गजाआड

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात गुन्हेगार कऊ भाई उर्फ फ्रान्सीस पॅट्रीक मॅनवेल व त्याचे साथीदार संतोष बजाज, पंकज बजाज, आतिक कुरेशी अशांनी संगनमत करून फौजदारी पात्र कट केला. इगतपुरी शहरातील हॉटेल व्यावसायिक अभय दिलीपचंद भन्साळी, रा. खालची पेठ, इगतपुरी यांनी बजाज कुटुंबाकडून घेतलेल्या प्रॉपर्टीचा कोणताही मोबदला न देता ती परत बळकावण्यासाठी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांना निर्जन परिसरात घेऊन जाऊन यातील आरोपींनी बनवून आणलेल्या संमतीपत्रावर जबरदस्तीने सहया घेतल्या. आरोपी कऊ भाई उर्फ फ्रान्सीस पॅट्रीक मॅनवेल याने सदर प्रापर्टीची चावी फिर्यादीने आणून न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. म्हणून इगतपुरी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३८७,५०६, ३४, १२० (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. इगतपुरी शहरातील सर्वसामान्य नागरिक तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील स्टॉलधारक, व्यावसायिकांमध्ये डेव्हीड गँगच्या वरील कुख्यात गुन्हेगार कऊ भाई याचे धाक-दडपशाहीमुळे दहशहतीचे वातावरण निर्माण झालेले होते. यातील गुन्हेगारावर इगतपुरी पोलीस ठाण्यासह नाशिक शहरातील भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये खून, खूनाचा प्रयत्न, जबरी लुटमार, आर्म ऍक्ट असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी वरील कुख्यात गुन्हेगाराचा शोध घेवून त्यास अटक करण्यासाठी इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना सूचना दिल्या होत्या. त्यासाठी मुख्यालयाकडून अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली होती. त्यानूसार इगतपुरी पोलीसांनी सायंकाळी छापा टाकून कुख्यात गुन्हेगार नामे १) कऊ भाई उर्फ फ्रान्सिस पॅट्रीक मॅनवेल, वय २९, रा. गायकवाड नगर, इगतपुरी यास ताब्यात घेतले. त्याचे साथीदार २) संतोष गंगाबिसन बजाज, ३) पंकज जगदिश बजाज, दोन्ही रा. इगतपुरी रेल्वे स्टेशन समोर, टाटे बिल्डींग, इगतपुरी, ४) आतिक मैन्नुद्दीन कुरेशी, रा. गोसावीवाडी, इगतपुरी यांना देखील इगतपुरी शहरातून ताब्यात घेवून वरील गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाणेकडील सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे हे करीत आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल भामरे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि सोपान राखोंडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व क्युआरटीचे पथकाने वरील कुख्यात गुन्हेगारास ताब्यात घेवून अटक केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!