शैक्षणिक वर्ष समाप्तीचा निर्णय घेण्याची शिक्षण मंत्री यांचेकडे शिक्षक भारतीची मागणी

इगतपुरीनामा न्यूज दि. 24 : शैक्षणिक वर्षाचा कालावधी संपलेला असताना कुठल्याही प्रकारचा निर्णय नसल्याने सर्वत्र संभ्रमावस्था आहे. ऑनलाईन शिक्षणास विद्यार्थी, शिक्षक व पालक कंटाळलेले आहेत. दरवर्षी मार्च महिन्यात पुढील शैक्षणिक नियोजनाचे परिपत्रक काढत असताना यंदा शैक्षणिक वर्षाचे कुठल्याही प्रकारचे नियोजन अद्यापपर्यंत झालेले नाही.परिक्षा व सुट्या यांचे नियोजन गतवर्षापासुन बंद केले की काय? पुढच्या शैक्षणिक कालावधीचे नियोजन शिक्षण संचालक यांनी काढून तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी पत्राद्वारे केली असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष राजेंद्र दिघे, राजेंद्र लोंढे यांनी दिली.
दरम्यान पुढील शेैक्षणिक वर्षाचे नियोजन, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षातील शाळा सुरू होण्याची तारीख कळवता येईल,शाळासिद्धी व युडायसची माहीती भरण्याची मुदतवाढ २६ एप्रिल असुन लॉकडाऊन व कोवीड परिस्थितीत पुढे ढकलुन लॉकडाऊननंतरची तारीख द्यावी,आणि कोविड काळात कर्तव्य बजावतांना व शैक्षणिक कर्तव्य बजावतांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना कोवीड झाला आहे अशा शिक्षक- शिक्षकेतरांचा रजा कालावधी कर्तव्य कालावधी समजण्याबाबत परिपत्रक काढावे, वर्षसमाप्ती काळात सेवा पुस्तके अद्ययावत करून रजा नोंद करावी या मागण्या करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!