इगतपुरीनामा न्यूज – आगामी निवडणुका लक्षात घेता युवकांचे संघटन मजबूत करण्याचे काम युवकचे जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ हे करत आहे. त्यामुळे जिल्ह्यात युवक मोठ्या प्रमाणात कामे करतील असा विश्वास इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले यांनी व्यक्त केला. घोटी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा युवा संवाद मेळावा संपन्न झाला. त्याप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले बोलत होते. शासकीय योजना सर्वसामान्य पर्यंत पोहचवुन पक्ष संघटन मजबूत करणे महत्वाचे आहे. आगामी काळात बेरोजगार तरुणाना रोजगार मिळेल यासाठी सर्वच तालुक्यामध्ये रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत. युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात पक्ष संघटन वाढविण्यासाठी जिल्हाभर कार्यक्रम घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे योगेश निसाळ यांनी या युवा संवाद मेळाव्या प्रसंगी बोलतांना दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, माजी आमदार शिवराम झोले, कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके, माजी तालुकाध्यक्ष उत्तम सहाणे, माजी पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारुंगसे, समता परिषद तालुकाध्यक्ष शिवा काळे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, थोड्याच दिवसात लोकसभेच्या व इतर निवडणुका जवळ येत असुन पक्ष वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. या मेळाव्यासाठी युवक जिल्हा उपाध्यक्ष अनिल पढेर, इगतपुरी शहराध्यक्ष वसिम सय्यद, डॉ. सुधाकर जगताप, आदित्य गव्हाणे, मदन कडु, रोहीदास गोवर्धने, हरीश चव्हाण, वजाहत शेख, प्रज्योत सुरवडकर, आशुतोष चव्हाण, अमर जगताप, शुभम महाजन, जयेश पिंपळीसकर, महेश शिरोळे, भाऊ पासलकर, यांच्यासह मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते. या संवाद मेळाव्यात सुशिल भोंडवे, कुशल पासलकर, अविनाश ठाकुर, रामेश्वर भोंडवे, मयुर तायडे, दिपक भोंडवे, आदित्य भोंडवे यांच्यासह शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे पक्ष प्रवेश घेतला.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group