इगतपुरी तालुक्यात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला उदंड प्रतिसाद : सरकारविरोधात नागरिकांशी साधला संवाद ; घोटी येथे झाला समारोप

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण होत असल्याने जनसंवाद यात्रेची राज्यात सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने सोमवारपासून यात्रा सुरु आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांच्या उपस्थितीत काँग्रेसची जनसंवाद यात्रा पार पडली. यावेळी गेल्या नऊ वर्षात भाजपा सरकारने दिलेली खोटी आश्वासने, गगनाला भिडलेले पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्य तेलाचे भाव, शेतमालाला न मिळालेला हमी भाव, शालेय व शेती साहित्यावर लावलेला जीएसटी, मोठ्या उद्योगपतींचे माफ केलेले १६ लाख कोटींचे कर्ज, सातत्याने होणारे महापुरुषांचे अपमान, चिघळवलेले मराठा आंदोलन या सर्व बाबींची पोलखोल करण्यात आली. सर्वसामान्य माणसापर्यंत ही माहिती पत्रकाद्वारे पोहोचवण्यात आल्याचे काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी सांगितले.

वाडीवऱ्हे, गोंदे दुमाला, कुऱ्हेगाव, बेलगाव कुऱ्हे, अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक, साकुर, साकुरफाटा, धामणगाव, धामणी, पिंपळगाव मोर, देवळे आदी रॅली काढून प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. गोंदे दुमाला येथे ग्रामस्थ व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांच्या वतीने रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. घोटीत पायी रॅली काढण्यात आली. यानंतर राजाराम साळवी मंगल कार्यालयात हभप फणसे महाराज यांच्या उपस्थितीत आमदार हिरामण खोसकर यांचा सत्कार व आशीर्वाद देऊन रॅलीची सांगता झाली. याप्रसंगी जेष्ठ नेते जनार्दन माळी, प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ, तालुकाध्यक्ष रमेश जाधव, कचरू पाटील शिंदे, पांडूरंग शिंदे, देवराम मराडे, बाळासाहेब कुकडे, लकी गोवर्धने, वंदना पाटील, महिला तालुकाध्यक्ष मनीषा मालुंजकर, संपत वाजे, संतोष सोनवणे, अरुण गायकर, बाळासाहेब लंगडे, सुदाम भोर, उत्तम भोसले, बाळासाहेब वालझाडे, रामदास धांडे, जयराम धांडे, निवृत्ती कातोरे, रामचंद्र किर्वे, सविता पंडित, सुरेश धांडे, रेवणनाथ गुंजाळ, भाऊसाहेब खातळे, ज्ञानेश्वर खातळे, निवृत्ती नाठे, शंकर नाठे, भास्कर कातोरे, तुकाराम सहाणे, नंदराज गुळवे, संपत मुसळे, काशिनाथ तांबे, ॲड. गणपत चव्हाण, कमल नाठे, सोमनाथ भोंडवे, ज्ञानेश्वर कडू, प्रकाश तोकडे, अनिता घारे, दुभाषे बाबा, नंदराज भागडे, रामहरी गुळवे, प्रकाश नाठे, शंकर खातळे आदी उपस्थित होते

Similar Posts

error: Content is protected !!