गुणवंताचा आदर्श घेऊन गौरवशाली कार्य करणारी पिढी निर्माण होणार – प्रा. डॉ. देविदास गिरी : राजमुद्रा मंडळातर्फे गुणवंतांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – उत्तुंग यश मिळवणाऱ्या गुणवंताचा आदर्श घेऊन पुढील गौरवशाली कार्य करणारी पिढी निर्मित होईल. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे समृद्ध भारताचे स्वप्न साकार होणार आहे. विविध क्षेत्रात सन्मान मिळवण्यासाठी विविधांगी अभ्यास आवश्यक असून यासाठी राजमुद्रा मित्रमंडळाने गेल्या दहा वर्षांपासून सुरु केलेला सन्मानसोहळा समाजाला दिशादर्शक आहे असे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थीप्रिय मार्गदर्शक प्रा. डॉ. देविदास गिरी यांनी केले. गोंदे दुमाला येथील राजमुद्रा सामाजिक शैक्षणिक मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. हरिओम ढाबाचे संचालक अकबर पठाण यांच्या सौजन्याने माजी अध्यक्ष संदीप नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करून देशाचे, राज्याचे, गावाचे आणि आईवडिलांचे नाव मोठे करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यासाठी आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी सर्वांना कामाला लागावे. प्रमुख पाहुणे वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना निकोप यश मिळवण्यासाठी आतापासून कामाला लागून गौरव संपादन करावा यासाठी महत्वाच्या टिप्स दिल्या. शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस निवृत्ती नाठे, पत्रकार भास्कर सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेना माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, ग्रामपंचायत सदस्य शिवानंदबाबा बेंडकोळे, कचरू धोंगडे, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब खातळे, ग्रामविकास अधिकारी विजयराज जाधव, मुख्याध्यापक देवरे सर, विजय नाठे, बंडू नाठे, कमलाकर नाठे, रतन नाठे, महादू नाठे, दत्तू नाठे, सजन नाठे, तानाजी नाठे, गणेश नाठे, रामभाऊ नाठे, मोहन जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व विविध स्पर्धा परीक्षामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक संघाचे नूतन जिल्हा सरचिटणीस निवृत्ती नाठे, आदर्श शिक्षक हरिश्चंद्र जाधव, इयत्ता १० वीमधे सिद्धिविनायक विद्यालयात प्रथम क्रमांक कु. ज्योती भास्कर सोनवणे, द्वितीय कांचन दिलीप शेलार, तृतीय रोहिणी मोहन जाधव, चतुर्थ राणी लक्ष्मण राव, पाचवा क्रमांक गायत्री केरू ठाणगे, कुस्ती स्पर्धेत ८२ किलो गटात इगतपुरी तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात दुसरा कु. अनिकेत विश्वनाथ नाठे, २०० मीटर धावणे स्पर्धेत तालुक्यात प्रथम कु. पायल रोहिदास नाठे, १०० मीटर धावणे तालुक्यात प्रथम श्रवण बाळू मांडे, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. ज्योती भास्कर सोनवणे, द्वितीय कु. श्वेता विष्णू नाठे, तृतीय कृष्णा परमेश्वर नाठे, निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक रोहिणी मोहन जाधव, द्वितीय राणी लक्ष्मण राव, तृतीय कांचन दिलीप शेलार यांच्यासह बारावी कला शाखेतील कु. रविना एकनाथ बोराडे, कु. कादंबरी यादव नाठे, वैभव राजेंद्र नाठे, धनंजय जानकीराम घाटेसाव, कु. साधना राजाराम नाठे, बारावी वाणिज्य शाखेतील  कु. माया हिरामण कातोरे, कु. गायत्री वसंत पवार, कु. काजल अनिल गोऱ्हे, कु. वैष्णवी गणपत खांडबहाले, कु. प्रिया बाळू वाजे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष संदीप नाठे, विद्यमान अध्यक्ष समाधान वारुंगसे, बंडु नाठे कु. मच्छिंद्र काळे, ऋषिकेश नाठे, राहुल नाठे, लखन नाठे, अजय नाठे, प्रकाश नाठे, रामेश्वर चाटे, अजय गुप्ता यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय धातडक यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!