डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्राची नवीन कार्यकारिणी जाहीर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

नाशिक जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र ह्या अग्रगण्य संस्थेची नवीन संचालक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष म्हणून वामनराव गायकवाड, उपाध्यक्ष म्हणून विजयाताई ठाकूर यांची निवड झाली. संस्थेचे सरचिटणीस म्हणून प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ व समाजसेवक तथा वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. संजय दामू जाधव यांची बिनविरोध करण्यात आली. ही निवड पुढील तीन वर्षासाठी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड व नाशिक जिल्ह्यातील महिला चळवळीतील अग्रदूत डॉक्टर शांताबाई दाणी यांच्या प्रयत्नांनी 1965 साली सुरू झालेली ही संस्था आहे.

या संस्थेचे रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, कुणाल प्राथमिक विद्यालय जुना आग्रा रोड नाशिक व तक्षशिला विद्यालय नाशिकरोड, गौतम क्षेत्रालय नाशिकरोड असा शाखा विस्तार आहे. ग्रामीण भागातील आदिवासी आणि अनुसूचित जातीतील विद्यार्थिनी व विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहे. उत्तम शिक्षण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची वृत्ती ही संस्थेची वैशिष्ट्ये आहे. सध्या या संस्थेवर ज्येष्ठ कामगार नेते करुणासागर पगारे, वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते नितीन भुजबळ, भारतीय सेल कंपनीचे निवृत्त अधिकारी प्रबुद्धचंद्र कसबे, निवृत्त गटविकास अधिकारी गोविंदराव कटारे, निवृत्त प्राचार्य नानासाहेब पटाईत, माजी अतिरिक्त उपसंचालक आरोग्य विभाग नाशिक डॉ. राम पटाईत, होमगार्ड समापदेशक व स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी कॅशियर व माजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी शशांक हिरे आदी संचालक म्हणून काम करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!