इगतपुरी ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सीजन बेडची संख्या वाढवा ; जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना मनसेचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 23
इगतपुरी तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोविड रुग्णांना ऑक्सीजन बेड मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजनचे बेड त्वरीत वाढवण्यात यावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्यासह जिल्हाधिकारी यांना दिले. या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, इगतपुरी तालुका आदिवासी असुन बहुतांश नागरिक हे गरीब आहेत. एकीकडे तालुक्यात कोरोनाने थैमान घातले कोविड बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्राथमिक उपचारासाठी ऑक्सीजनची ज्या रुग्णांना गरज असुन कोरोना उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये केवळ २० बेड आहेत. ती संख्या कोविड बाधित रूग्णांच्या संख्याच्या तुलनेत फार कमी असुन यामुळे अनेक कोवीड रूग्णांना बेडच मिळत नसुन उपचाराअभावी रूग्णांना मृत्युला सामोरे जावे लागत आहे. अनेक रुग्णांची आर्थिक परीस्थिती नसल्याने ते खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकत नाही. अशा भयंकर परीस्थितीत महाराष्ट्र नवनिर्मान सेना व तालुक्याच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की आपण या गंभीर प्रश्नावर विचार करून अशा रूग्णांसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन बेडची संख्या वाढविण्यात यावी. त्यासाठी सर्वतोपरी आम्ही पक्षाच्या वतीने मदत करण्यास तयार आहोत. तरी आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन ऑक्सीजन बेडची संख्या त्वरीत वाढवावी व रुग्णांना मदत करावी या मागणीचे निवेदन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांनी दिले आहे.

बेडची संख्या तात्काळ वाढवा

तालुक्यात अनेक प्रकल्पाला शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्याने शेतकरी भुमिहीन झाला आहे. शेतकऱ्याच्या मुलांच्या हाताला रोजगार उपलब्ध नसुन अशा भयंकर परीस्थितीत खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती रुग्णांची नसल्याने इगतपुरी ग्रामीण कोविड रुग्णालयासह कोरपगांव येथील कोविड सेंटरमध्येही ऑक्सीजन बेडची संख्या वाढवण्यात यावी यासाठी मनसे पक्षाच्या वतीनेही सर्वोतपरी सहकार्य करू.
— संदीप किर्वे, जिल्हा उपाध्यक्ष मनसे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!