राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाचा मार्ग मोकळा : आमदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

इगतपुरीनामा न्यूज दि. 23 :

राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगाराबद्दल आमदार कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र लिहून चर्चा केली होती. शालार्थमध्ये बदल होईपर्यंत प्रचलित पद्धतीनुसार वेतन करण्याची विनंती केली होती. शुक्रवारी २३ एप्रिल अखेर त्यासंदर्भात जलदगतीने हालचाल होऊन शिक्षक, शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगारचा मार्ग मोकळा झाला आहे,अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.शालार्थ प्रणालीमध्ये बदल न झाल्यामुळे राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार थांबले होते. यासंदर्भात आमदार श्री पाटील यांनी २२ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी चर्चेनंतर वित्त विभागाने तशी तात्काळ परवानगी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार शिक्षण विभागाला पुढील दोन महिन्यांपर्यंत शालार्थमध्ये बदल करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे पगार वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. कोषागार कार्यालयाने शिक्षण विभागाची बिलं स्वीकारली. सोमवार पासून पगार वितरणाला सुरवात होईल, पुढील दोन, तीन दिवसात ते शिक्षकांच्या खात्यावरही जमा होतील, असे सुभाष मोरे यांनी सांगितले.

शिक्षकांना मुळ गावी जाण्याची परवानगी द्यावी

राज्यातील कोकण, मुंबईसह अनेक जिल्ह्यातील य शिक्षकांना स्वतःच्या मुळ गावाकडे जाण्याची परवानगी द्यावी अशीही मागणी राज्य सरकारकडे आमदार श्री पाटील यांनी केल्याचे राज्य सरचिटणीस भरत शेलार यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!