इगतपुरीनामा न्यूज, दि. 21 ( वाल्मिक गवांदे, इगतपुरी )
इगतपुरी शहर व तालुक्यातील रूग्णांना उपचाराकरीता वेळेत दवाखान्यात जाण्याकरीता गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाहिका व शववाहिका मिळत नाही. यामुळे तातडीच्या रुग्णांसह इतर रुग्णांचे देखील हाल होत असल्याची खंत शहरातील नागरीकांनी व्यक्त केली. याची दखल श्री साई साहाय्य समितीचे अध्यक्ष राजु देवळेकर यांनी घेतली. त्यांनी मुंबई येथील प्रभूनयन फाउंडेशनचे आनंद नितीन मवानी यांना ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहीका मिळावी म्हणुन साकडे घातले. याबाबत आनंद मवानी यांनी होकार दिला. समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असलेल्या देवळेकर यांनी क्षणाचाही विलंब न करता ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. डॉक्टर देवरे यांनी तत्काळ कागदांची पूर्तता करून दिली. आणि इगतपुरीकरांसाठी रुग्णवाहिका आज दाखल झाली. तमाम इगतपुरीकरांच्या वतीने श्री साई सहाय्य समिती व प्रभूनयन फाउंडेशन यांचे नागरीकांनी व ग्रामीण रूग्णालयाने मानले.
यावेळी तहसिलदार परमेश्वर कासुळे, आनंद मवानी, दिपा मवानी, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दिपक पाटील, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर पाटील, ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, डॉ. हिरकणी मोरे, एसएमबीटी हॉस्पिटलचे प्रदीप नाईक, नगरसेवक संपत डावखर, संतोष महाडिक, राहुल चांगरे, यशवंत दळवी, श्री साई सहाय समितीचे राजू देवळेकर, पोलीस कर्मचारी ईश्वर गंगावणे, राजेंद्र चौधरी, राजेश बागुल, नितीन देशमुख, नितीन चांदवडकर, मनोहर शिंगाडे, सत्तार मणियार, विठोबा डावखर, विनोद डावखर, राजू डावखर, ललित डावखर, सचिन गिते, संजय भोर, स्वप्नील तावडे, झोले आदी उपस्थित होते.