इगतपुरीनामा न्यूज, दि. 23
सलग काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या कमी होऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच आज अचानक बाधितांची संख्या वाढली आहे. आज सायंकाळी 5 वाजे पर्यंतच्या अहवालानुसार फक्त 2 कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज 48 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज 264 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य यंत्रणा, महसूल, पोलीस प्रशासन, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर आदींसह कोरोना योद्धे अखंड काम करीत आहेत. इगतपुरी, घोटी आणि ग्रामीण भागात निर्बंधांचे पालन होत असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पात्र व्यक्तींनी लसीकरणाचा लाभ घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008