राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२३’ : राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन, शिक्षक दिनी निकाल

इगतपुरीनामा न्यूज – शिक्षक ध्येय, ज्ञानसंवाद, संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हिंगणघाट, जि. वर्धा, नागपूर विभाग शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर, निंभोरकर होमिओ फार्मसी, अमरावती आणि वसुधा नाईक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे. पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २० विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्पर्धा आयोजनाचे हे चौथे वर्ष आहे.राज्यातील उपक्रमशील शिक्षक व शिक्षिका यांनी सकारात्मक विचारसरणी ठेऊन या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन संपादक मधुकर घायदार, ज्ञानसंवाद, संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हिंगणघाट, जि. वर्धा, नागपूर विभाग शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर, निंभोरकर होमिओ फार्मसी, अमरावती आणि वसुधा नाईक पुणे तसेच शिक्षक ध्येयच्या संपादकीय मंडळातर्फे करण्यात येत आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत होत असून शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे. राज्यातील शिक्षकांमधून प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी), माध्यमिक व उच्च माध्यमिक गट आठवी ते बारावी ( पदवीपर्यंत ) ह्या दोन गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. राज्यातील शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे कार्य करणाऱ्या संस्था या सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.

उपक्रम अहवाल लेखनाबाबत अधिक सविस्तर माहितीसाठी शिक्षकांनी https://www.shikshakdhyey.in. या संकेतस्थळाला भेट द्यावी. शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवतांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत एमएस वर्ड टायपिंग करून नंतर त्याची पीडीएफ pdf करून पाठवावी. उपक्रम हा शिक्षकांनी यापूर्वी स्वत: राबविलेला असावा. उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. विजेत्या उपक्रमशील शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रिंट प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयची प्रिंट मासिके घरपोच पाठविण्यात येईल. सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे ५०+ डिजिटल अंक व्हाट्सॲप नंबरवर पाठविण्यात येईल. स्पर्धेचा निकाल दि. ५ सप्टेंबर २०२३ ला मंगळवारी ‘शिक्षक दिनी’ साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये जाहीर करण्यात येईल. उपक्रमासंबंधी माहितीसाठी ९६२३२३७१३५ यावर किंवा उपसंपादक, उपसंपादिका, प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा.

Similar Posts

error: Content is protected !!