आगामी लोकसभेसाठी ॲड. संदीप गुळवे यांनी उमेदवारी करावी : इगतपुरी तालुका इंदिरा काँग्रेसची मतदार संपर्क अभियान आढावा बैठक संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी काळात गट तट विसरून सर्वांनी एकत्र जोरात काम करावे, आगामी लोकसभेसाठी ॲड. संदीप गुळवे यांनी उमेदवारी करावी. पुढचा आमदार काँग्रेसचाच निवडून येईल विश्वास इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी विश्वास व्यक्त केला. इगतपुरी तालुका काँग्रेसची मतदार संपर्क अभियान आढावा बैठक रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली गोंदे दुमाला येथे संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते. राज्यात पक्षाची फोडाफोडी आणि अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण सुरु आहे. काँग्रेस हाच एकमेव एकनिष्ठ पक्ष आहे. हा पक्ष वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे यांनी व्यक्त केले.

या बैठकीत मणिपुर येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबुत करण्याबाबत बैठकीत मार्गदर्शन केले. बैठकीला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, महिला तालुकाध्यक्ष मनिषा मालुंजकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे, ज्येष्ठ नेते पांडुरंग शिंदे, खरेदी विक्री संघाचे व्हॉइस चेअरमन जयराम धांडे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन बाळासाहेब वालझाडे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, कचरू पा. शिंदे, किसान सेल तालुकाध्यक्ष सुदाम भोर, बाजार समिती उपसभापती शिवाजी शिरसाठ, देवराम मराडे, शंकरराव खातळे, पंढरीनाथ बऱ्हे, माजी सरपंच तुकाराम सहाणे, अरुण गायकर, संतोष सोनवणे, लकी गोवर्धने, योगेश सुरुडे, संतोष जगताप, प्रकाश पंडीत, विश्वजित अहिरे, सुरज हांडोरे, संकेत पगारे, रमेश देवगिरे, सोमनाथ बुकाणे यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!