इगतपुरी तालुक्यातील विभक्त शिधापत्रिकांचे १ हजार ७८६ अर्ज नामंजूर : विधानसभा तारांकित प्रश्नाला मंत्री छगन भुजबळ यांचे उत्तर

इगतपुरीनामा न्यूज, दि. 11

इगतपुरी तालुक्यातील गावपाडे आणि आदिवासी वस्तीतील सुमारे ३ हजार १७३ विभक्त कुटुंबातील नागरिकांच्या शिधापत्रिकांचे अर्ज नवीन डाटा एन्ट्रीसाठी प्राप्त झाले असून त्यातील ९७७ अर्ज मंजूर झाले आहेत तर १७८६ अर्ज नामंजूर केले आहेत. ४१० नागरिकांचे कागदपत्रे उपलब्ध नाहीत, तसेच डाटा एन्ट्रीसाठी ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये स्प्लिट पर्याय पूर्वीपासून उपलब्ध असल्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, इगतपुरी तालुक्यातील ३ हजार १७३ विभक्त कुटुंबातील नागरिकांच्या शिधापत्रिकांचे अर्ज नवीन डाटा एन्ट्रीसाठी ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये स्प्लिट पर्याय उपलब्ध करुन देण्याची मागणी समर्थन संस्थेने केली होती. मागणी केलेला स्प्लिट हा पर्याय अगोदरच या ऑनलाईन प्रणालीमध्ये उपलब्ध असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!