मोडाळेच्या उपसरपंचपदी गणेश ढोन्नर बिनविरोध : राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली झाली निवड

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मोडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. गणेश ढोन्नर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच म्हणून निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, लोकनियुक्त सरपंच शिल्पा आहेर यांनी नूतन उपसरपंच गणेश ढोन्नर यांचे अभिनंदन केले आहे. निकालाची घोषणा होताच समर्थक आणि ग्रामस्थांनी जल्लोष करून अभिनंदन केले. बैठकीवेळी ग्रामपंचायत सदस्य सीताबाई जगताप, मंदा बोडके, गोरख गोऱ्हे, आशा गांगड, वनिता गोऱ्हे, सुरेश लहांगे, ज्ञानेश्वर झोले, काजल बिन्नर हजर होते.

Similar Posts

श्रीमद भागवत कथा अमृत अनंत असून भगवंताच्या नामस्मरणाने पापाचा उद्धार – भागवताचार्य गोकुळ महाराज पुंडे : घोटीत श्रीमद भागवत कथा व श्रीराम कथा सत्संग सोहळा

गरीब कुटुंबातील उमेदवार लकीभाऊ जाधव विरोधातील भांडवलदार प्रवृत्तीला हद्दपार करून लकीभाऊ जाधव यांना निवडून द्या – माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात : लकीभाऊ जाधव ह्या क्रियाशील कार्यकर्त्याला संधी देऊन मतदारसंघ विकसित करा – खा. राजाभाऊ वाजे : धरणातील पाणी आधी तालुक्याला मगच मुंबई व मराठवाड्याला – काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव

error: Content is protected !!