मानव विकास परिषदेच्या त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्षपदी योगेश मोरे यांची निवड

ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

मानव विकास परिषदेच्या त्र्यंबकेश्वर तालुक़ाध्यक्षपदी खंबाळे येथील योगेश मोरे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र संस्थेचे अध्यक्ष अफसर शेख, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा जयश्री अहिरे, नाशिक जिल्हाध्यक्ष जयश्री रहाडे यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीनंतर सर्वच स्तरातून योगेश मोरे यांचे अभिनंदन होत आहे.

शोषित श्रमिकांचा पोलीस कोठडीत मृत्यू ,बेकायदेशीर अटक, शोषण गुलामगिरी, दहशत, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय,  सरकारी कार्यालयातुन गोरगरीबांवर होणारा अन्याय, मानवी हक्कांचे उल्लंघन, शासकीय अधिकाऱ्यांकडून अधिकाराचा दुरूपयोग, भांडवलदार व सत्ताधाऱ्यांकडुन  शासकीय यंत्रणेचा होणारा गैरवापर हे समुळ नष्ट करण्यासाठी, सर्वसामान्याचे  संवैधानिक मानवी हक्क, गोरगरीबांना न्याय अधिकार मिळवून देण्यासाठी संस्था कार्यरत आहे. ह्या संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी ग्रामीण भागातुन होतकरू युवा नेतृत्व योगेश मोरे यांची निवड झाल्याने खंबाळे येथे स्वागत करण्यात आले. शोषित पिडीतांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज़ उठवून  न्याय देण्यासाठी काम करणार असल्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष योगेश मोरे यानी संगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!