इगतपुरीनामा न्यूज, दि. 21
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आज ऑक्सिजन टॅंक लीक झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यु झाल्याच्या घटनेनंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नाशिक मनपाचे आयुक्त कैलास जाधव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याला उत्तर देत जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांनी दरेकर यांना लक्ष करत ही वेळ राजकारण करण्याची नाही. अतिशय कठीण काळात जनता कोरोनाचा सामना करत आहे. ऑक्सिजन टॅंक देखभाल करण्याची सर्वस्वी जबाबदारी विशिष्ट काम करणाऱ्या यंत्रणेची येते. मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उचलली जीभ लावली टाळ्याला असे करत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यावर ठपका ठेवत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ही बाब चुकीची असल्याचे सांगत प्रविण दरेकरांना राजकारण कळते का? असा सवाल उपस्थित केला आहे.
वास्तविक पाहता महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची नियुक्ती कोरोना काळ सुरू झाल्यापासून सुरू झाली आहे अतिशय कठीण काळात आयुक्त जाधव यांनी महापौर कुलकर्णी यांच्यासोबत उत्कृष्ट नियोजन करत प्रशासकीय यंत्रणा राबवित कोरोना दिवसरात्र रस्त्यावर उभे राहून संकटाशी मुकाबला सुरू आहे. मात्र प्रविण दरेकरांचे वक्तव्य हे चांगल्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणणारे आहे. वास्तविक पाहता यात आरोग्य यंत्रणेशी दोष असू शकतो. मात्र उचलली जीभ लावली टाळुला असे न करता शहानिशा करूनच वक्तव्य करावे असे माधुरी भदाणे यांनी म्हटले आहे.
जिजाऊ ब्रिगेड चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी
फक्त राजकारण करून लक्ष वेधून घेण्याचे दिवस आत्ता संपले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांना जनता वैतागून गेली आहे. घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबाना मदत करण्याची वेळ आहे. कृपया कोणीही घटनेचे राजकारण करू नये. चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी जिजाऊ ब्रिगेड खंबीरपणे उभी राहील.
– माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र
Comments