रामनामाचा महिमा

ह. भ. प. सूर्यकांत महाराज सहाणे
साकुर, ता. इगतपुरी, जि. नाशिक
संपर्क : 8975809654

ज्या प्रभू रामचंद्रांचे जीवन चरित्र आपण अनुभवतो, त्यांचं महाकाव्य वाचतो ते आलं कुठून ? ते लिहिलं कुणी ? आणि कशाच्या जोरावर लिहिलं ते बघू. रामायण हे एक महाकाव्य आहे. हजारो वर्षे लोटली, तरी या काव्याचा, यातील प्रसंगांचा, तत्त्वांचा प्रभाव अद्यापही ओसरलेला दिसत नाही. याउलट दिवसेंदिवस त्याविषयीची गोडी वाढत चालल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्रेतायुगात महर्षी वाल्मीकि यांनी लिहिलेले रामायण प्रमाण मानले जाते. यावरूनच गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानस रचल्याचे सांगितले जाते. आदिकवी आणि रामायणाचा कर्ता असलेल्या महर्षी वाल्मीकि यांचा जन्म अश्विन पौर्णिमेला झाल्याचे मानले जाते. यंदा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी वाल्मीकि जयंती साजरी केली जाणार आहे.
आदिकवी रामायणाचा कर्ता असलेल्या वाल्मीकिंविषयी अनेक मान्यता असल्याचे दिसून येते. वाल्मीकिंचे आई आणि वडील त्यांना एका किराताजवळ ठेवून तपश्चर्येला निघून जातात. आई वडील तपश्चर्येला गेल्यावर तो लूटमारीचा धंदा करू लागला. लोकांना मारणे, त्यांच्याकडे जे काही धन आहे ते लुटणे  हा त्याचा नियम झाला. त्याने किती सामान्य लोक मारले ह्याचा तो हिशेब ठेवत नव्हता. परंतु शुद्ध ब्राम्हण किती मारले याचे तो गणित ठेवत असे. एक ब्राम्हण मारला की एक मोहरी इतका खडा घेऊन रांजनात टाकायचा. असं सांगतात की त्याने असे 7 रांजण भरवले. आणि एका रांजनात सात बैलाची पात फिरेल इतके मोठे ते रांजण. म्हणून त्याचे नाव ‘वाल्या’ पडले व सर्व लोक त्याला ‘वाल्या कोळी’ म्हणू लागले. याला एकदा काही नारद महर्षींनी घेरले. परंतु, त्या नारद ऋषींनी त्याला उपदेश केला. त्याच्या जीवावर चैन करणारे त्याचे कुटुंबीय त्याच्या पापात वाटेकरी होतात काय ? असे विचारून येण्यास सांगितले. कोणीही जेव्हा तयार होईना, तेव्हा त्यास उपरती झाली. बसल्या जागी त्याने ऋषींनी दिलेल्या ( राममंत्राचा ) जप सुरू केला. त्याच्या अंगाभोवती वल्मी म्हणजे वारूळ निर्माण झाले. त्यामुळे त्यांना पुढे ‘वाल्मीकि’ असे नाव मिळाले, आणि त्याच वाल्या कोळ्यांनी प्रभू रामचंद्र जन्माला येण्याअगोदर रामायण लिहिले. हे कशाच्या बळावर तो करू शकला ? केवळ म्हणजे राम नाम मंत्राचा जप ह्याच्या जोरावर.    महर्षी वाल्मीकिंना तपस्वी, मुनिपुंगव, द्विज अशी विशेषणे रामायणामध्ये योजलेली आढळतात.

जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात
कोळीयाची कीर्ती वाढली गहन
केले रामायण रामा आधी
म्हणून आपण सुद्धा राम मंत्राचा जप करूया. श्री राम जय राम जय जय राम

( लेखक सुप्रसिद्ध लोकप्रिय बालकीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत. )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!