इगतपुरी तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे
आज नवे 31 तर 222 जणांवर उपचार सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. 21
गेल्या आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण हळूहळू कमी कमी होत चालले आहे. दुसरीकडे कोरोना बाधित असणारे रुग्णही चांगल्या संख्येने कोरोनामुक्त होत असल्याची दिलासा देणारी बातमी आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 47 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज नव्याने 31 रुग्णांची नोंद झाली. एकंदरीत आज दिवस अखेर 222 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. नागरिकांनी सहकार्य केल्यास इगतपुरी तालुक्यातून लवकरच कोरोना हद्दपार करू असा आशावाद आरोग्य कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड ( चुंचाळे ) यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडयाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत.
बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी

Leave a Reply

error: Content is protected !!