इगतपुरीनामा न्यूज, दि. 21
कोरोना उच्चाटनाच्या दृष्टीने जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आज इगतपुरी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, संपर्क अधिकारी यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये विविध विनंती वजा सूचना केल्या आहेत. त्या सूचना सर्वांच्या माहितीसाठी देत आहोत.
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये Trace, Test, Treat आणि लसीकरण चार गोष्टी करणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणीही झोन मधून बाहेर जाता कामा नये. बाहेरील व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जाता कामा नये. अशा पद्धतीने सर्व ग्रामपंचायतीमध्ये पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक कंटेनमेंट मधील प्रत्येक पेशंटचे 20 high risk व 20 low risk पेशंट तपासणी शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सहाय्यक यांच्या मदतीने तपासणी करावी. त्यानुसार तात्काळ यावरील उपाय योजना करावयाच्या आहेत. ज्या ठिकाणी पेशंटला विलगीकरण केल्यानंतर स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था असेल त्या ठिकाणी पेशंट विलगीकरण करावयाचे आहे. परंतु ज्या ठिकाणी ही सुविधा नसेल त्या ठिकाणी पेशंट शाळेत संस्थात्मक विलगीकरान करून isolate करायचे आहे. त्या ठिकाणी सदर पेशंटला जेवणाचा डबा घरून देण्याची व्यवस्था करायचे आहे. असं केल्यास आरोग्य कर्मचार्यांवर जास्त ताण पडणार नाही. पेशंट ट्रीटमेंट करायला सोपे जाईल. सरपंच महोदय यांना यावेळी विनंती करण्यात आली की, आपल्या गावात लग्न समारंभ, दशक्रिया विधी कार्यक्रम वीस ते पंचवीस लोकांमध्येच करण्याची दक्षता घ्यावी. जर याचे पालन कोणी करत नसेल तर त्याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला कळविण्यात यावे. कोविड टेस्ट न करता HRCT Test स्वतःहून करायची आवश्यकता नाही. शासनाने सांगितलं माझे कुटुंब माझी जबाबदारी त्याच पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माझे गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून गावात कोणीही बाहेरील व्यक्ती आत जाणार नाही. आत असलेली व्यक्ती बाहेर जाणार नाही. याबाबत दक्षता घेण्यात यावी. लसीकरण करणे करता ज्या ठिकाणी ज्या दिवशी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन गर्दी न करता साधारणता दहाच्या पटीत लसीकरण करणे करता उपस्थित राहणे आवश्यक आहे. म्हणजे लस वाया जाणार नाही व जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करून घेता येईल. जे पेशंट सिरीयस आहेत त्या पेशंटला एसएमबीटी कॉलेज येथे ऍडमिट करणेबाबत दक्षता घ्यावी. वरील प्रमाणे सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आज इगतपुरी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, खातेप्रमुख यांना दिल्या. ह्या सूचनांचे तंतोतंत पालन झाल्यास तालुक्यातील कोरोना हद्दपार होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group