कळसुबाई मित्र मंडळाकडून रामस्वरूप कोरोना योद्धयांचे रामपूजन ; कोविड सेंटरला विविध साहित्य देऊन रामनवमी साजरी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 21 ( वाल्मिक गवांदे, इगतपुरी )

कोरोना महामारीत मनोबल आणि कर्तव्य याची सांगड घालणारे कोरोना योद्धे रामस्वरूप आहेत. कर्तव्य पार पाडतांना आपल्यासह लोकांचेही मनोबल टिकवून ते कर्तव्य बजावत आहेत. अशा रामस्वरूप देवदूतांमुळे नागरिक रामराज्याची अपेक्षा करू शकतात. ह्या पार्श्वभूमीवर सतत नवे काही तरी करून समाजासाठी नवा संदेश देण्याची धडपड करणाऱ्या घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी अनोखी रामनवमी साजरी केली. आजच्या रामनवमी पर्वाचे औचित्य साधत कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या संकल्पनेतुन कोविड सेंटरमध्ये रामनवमी संपन्न झाली. मंडळाच्या गिर्यारोहकांतर्फे इगतपुरी तालुक्यातील कोरपगाव कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांना अत्यावश्यक वाफ घेण्याचे ५० मशिन स्वखर्चाने देण्यात आले.  मंडळाचे सदस्य घोटीतील प्रसिद्ध पूजा मेडिकलचे संचालक उमेश हेमके यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात आवश्यक असणारा औषध साठा कोविड सेंटरला देण्यात आला.
कोविड सेवेत अतिशय तत्पर असलेले “कोरोना योद्धे” यांचा इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, डॉ. अक्षय माघाडे या रामस्वरूप देवदूतांचे कळसुबाई मित्र मंडळाने औक्षण केले. शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरपगाव कोविड सेंटरमध्ये ही अनोखी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. कु. मनिषा भगीरथ मराडे हिने रामनवमीचे औचित्य साधुन कोरपगांव येथील कोविड सेंटर येथे सेवा देणारे डॉ. अक्षय माघाडे, डॉ. सागर थोरात, डॉ. कापडणीस, डॉ. शेळके नाना यांचे औक्षण केले.
या उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, उमेश हेमके, अभिजित कुलकर्णी, प्रवीण भटाटे, बाळासाहेब वाजे, बाळू आरोटे, अशोक हेमके, काळू भोर, डॉ. महेंद्र आडोळे, निलेश पवार, शाहीर बाळासाहेब भगत, प्रशांत येवलेकर, विनोद भागडे, विकास जाधव, उमेश दिवाकर, सोमनाथ भगत, पुरुषोत्तम बोराडे, गोकुळ चव्हाण, सुरेश चव्हाण, लक्ष्मण जोशी, ज्ञानेश्वर मांडे, संकेत वाडेकर, गजानन चव्हाण, बालाजी तुंबारे, भाऊसाहेब जोशी, संदीप खैरनार, रोशन लहाने आदी गिर्यारोहकांनी सहभाग घेऊन मोलाचे सहकार्य केले.

रामस्वरूप कोरोना योद्धे सन्मानित केल्याचा आनंद

नागरिकांना निरामय आरोग्य, सुदृढता आणि रोगमुक्त करणारे खरे ‘श्रीराम” भगवान हे कोरोना योद्धे आहेत. त्यांच्यामुळे सुखी जीवन जगण्याचा आश्वस्त शब्द रामबाण ठरतो. अशा योद्धयांचा रामस्वरूप समजून सन्मान केला. यासह 50 वाफेचे मशीन, आवश्यक औषधासाठा सुपूर्द केला. रामनवमीनिमित्त आजचा सन्मान घडवून आणल्याने कृतकृत्य वाटले. भगीरथ मराडे, अध्यक्ष कळसुबाई मित्रमंडळ घोटी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!