स्वातंत्र्यदिनानिमित्त अमोल पवार यांच्याकडून कुऱ्हेगावला विविध सामाजिक उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

कुऱ्हेगाव येथील अंगणवाड्यांना पोषण आहारासाठी कुकर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रिपाई कामगार आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष अमोल पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवला. गावातील अंगणवाड्यांना पोषण आहारासाठी कुकर नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. अंगणवाडी सेविकांनी जिल्हाध्यक्ष पवार यांना सांगितले. त्यांनी स्वखर्चातून कुकरची व्यवस्था करून दिल्याने अंगणवाडी सेविकांनी त्यांचे आभार मानले. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अमोल पवार हे नेहमी प्रयत्न करीत असतात. दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम राबवित असतात. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त कुऱ्हेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले आहे. यावेळी रवी पवार, बाळासाहेब धोंगडे, विशाल पवार, योगेश धोंगडे, बाळा पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेरणेने सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी प्रत्येक शाळेला शैक्षणिक साहित्य आम्ही देतो. मुलांना शिक्षणाकामी काही अडचण असल्यास संपर्क साधा. आम्ही मदत करू.
- अमोल पवार, जिल्हाध्यक्ष रिपाई कामगार आघाडी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!