पीएचडी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया माहिती

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क – ९८२२४७८४६३

पीएचडी साठी प्रवेश
रसायनशास्त्र ( Chemistry ), भौतिकशास्त्र ( Physics ), हिंदी व मराठी या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या ज्या विद्यार्थ्यांना पीएचडी करावयाची आहे त्या विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेचा अभ्यास करून अर्ज करावा.
सिध्दार्थ कॉलेज, मुंबई ३४८, आनंद भवन, डॉ. दादाभाई नौरोजी फोर्ट, मुंबई येथील पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिध्दार्थ कॉलेज ऑफ आर्टस् , सायन्स अँड कॉमर्समध्ये वरील विषयांच्या पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे आवेदन महाविद्यालयाने प्रसिध्द केले आहे.

ऑनलाईन अर्ज
ज्या विद्यार्थ्यांना वरील विषयात पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज पाठविणे आवश्यक असून siddharthcollege2020@gmail.com या ईमेलवर प्राचार्य, सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स, मुंबई यांच्या नावे अर्ज करावेत.

पाठवायची कागदपत्रे
०१. कोऱ्या कागदावर प्राचार्यांच्या नावाने लिहिलेल्या अर्जासोबत खालील गोष्टी पाठविणे आवश्यक आहे.
०२. संशोधन आराखडा ( Reserch Proposal ) असेल तर.
०३. अनुभवाचे प्रमाणपत्र ( Work Experience Certificate ) असेल तर
०४. पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या मार्कशिट व पासिंग सर्टिफिकेटच्या फोटो कॉपी
०५. एम. फिल., सेट, पेट, नेट, स्लेट यापैकी जी प्रमाणपत्रे, मार्कशिट असेल त्याच्या फोटोकॉपी पाठविणे आवश्यक आहे.

■ प्रवेशाची पात्रता
वरील विषयाच्या पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
०१. संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी ५५ टक्के मार्कांसह असणे आवश्यक
०२. विद्यापीठ अनुदान आयोग ( UGC ) किंवा कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च ( CSIR ) यांची मान्यता असलेली जेआरएफ किंवा नेट / स्लेट / एम.फिल./ पेट ( conducted by University of Mumbai.) in respective subject as per University Circular No. Exam/ Thesis/ Univ/ VCD/ 947 of 2018 dated 15th June 2018. यापैकी एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

अर्ज करण्याची अंतिम मुदत
अर्ज ऑनलाईन ३० एप्रिल २०२१ पर्यंत महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या नावे वर दिलेल्या ईमेलवर मिळणे आवश्यक असून ऑनलाईन मुलाखतीनंतर विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आहेत.)

Similar Posts

Comments

  1. avatar
    प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

    अतिशय प्रभावी लेख आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!