गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायत परिसरात सैनिक, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन : सरपंच शरद सोनवणे आदींच्या संकल्पनेनुसार अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

गोंदे दुमाला येथे ७५ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे, उपसरपंच शोभा राजाराम नाठे, ग्रामविकास अधिकारी विजयराज जाधव व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संकल्पनेतून 13 ऑगस्टला ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्य लिपिक सुनिल सावळीराम नाठे, जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहन विद्यार्थिनी कु. श्रुती बहिरू नाठे हिच्या हस्ते करण्यात आले. १४ ऑगस्टला ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक निवृत्ती यशवंत नाठे यांच्या हस्ते, जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहन माजी सैनिक अनिल गणपत नाठे यांच्या हस्ते करण्यात आले.

आजच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाला ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन माजी सैनिक निवृत्ती मुरलीधर आहेर यांच्या हस्ते, जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण विद्यमान सैनिक सुजित माधव खातळे, सिद्धिविनायक विद्यालयाचे ध्वजारोहण माजी सैनिक राजाराम भवानी आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गावातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, विद्यमान सैनिक, ज्येष्ठ नागरिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य गणपत जाधव, कचरू धोंगडे, राजेंद्र नाठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी उपसरपंच परशराम नाठे, सीताबाई नाठे, कमलाकर नाठे, माजी उपसभापती जिजाबाई नाठे, माजी पं.स. सदस्य रामदास सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम बेंडकुळे, कृष्णा सोनवणे, सविता नाठे, वैशाली नाठे, लिलाबाई नाठे, दीपिका नाठे, सोसायटी चेअरमन विजय कचरु नाठे, व्हॉइस चेअरमन संजय नाठे, पोलीस पाटील शैला नाठे, माजी पोलीस पाटील प्रकाश नाठे, तलाठी कैलास अहिरे, माजी चेअरमन विजय बी. नाठे, शांताराम जाधव, माधव नाठे, भूमिपुत्रचे विनोद नाठे, सजन नाठे, मोहन जाधव, डॉ. प्रीती पाटील, मुख्याध्यापक श्री. थोरात सर, अहिरे सर, गावातील राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, औद्योगिक, कामगार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सार्वजनिक मित्र मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!